कधी वाटत

Started by rahul.patil90, October 06, 2013, 06:25:27 PM

Previous topic - Next topic

rahul.patil90

कधी वाटत 

मनात वाटत वळवाचा पाऊस व्हाव
पाऊस होऊन तिच्या अंगणातल्या मातीत
बरसाव मोगर्‍याच्या  कळ्यावर पडावं
आणि तिच्या केसात मळावं
मग हळूच वाटत झुळूक वाटत
झुळूक होऊन तिच्या ओढणीत शिराव
मग वाटत कोवळं ऊन व्हाव
तिला गुलाबी थंडीत भिडावं
तिन कावेत होताच तिला बिलगाव
आणि तिच्यात सामावून जावं
कधी वाटत सावली व्हाव
कधी वाटत धुंक व्हाव
कधी वाटत .........।

काहीही होऊन तिच्या सोबत रहावं
नेहमीच तिच्यावर प्रेम करावं
पण ते तिला कधीच न कळावं

----------------- राहुल पाटील 

rahul.patil90


rahul.patil90

कवीमित्र सागर

आपण केलेल्या बदल खुप उत्कृष्ट आहे. मला हा बदल आवडला.

धन्यवाद

Aarati Lokhande


rahul.patil90

धन्यवाद aarti....

dipak chandane

मित्रा
मस्त लिहितोस रे 
छान .......