ही रात थांबावी

Started by केदार मेहेंदळे, October 14, 2013, 01:55:13 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

भाषांतर करणे हि तशी अवघड बाब आहे. ते कवितेच असेल तर श्ब्द्शहा भाषांतर केले तर मूळ कवितेची गंमत जाते. त्यामुळे कवितेच भाषांतर करताना भावना काय आहेत ते समजून घेऊन भाषांतर करायचे असते. आणि तेच जेव्हां गाणं असतं तेंव्हा गाण्याची रिदमही लक्षात ठेवावी लागते.

मर्डर -२ मधल्या "ये रात रुक जाए'' ह्या गाण्यानी आणि त्याच्या चालिनि मला भलतीच भुरळ घातली अन मी त्याचं भाषांतर केलं. पण माझं भाषांतर म्हणजे नुस्त ...भाषांतर होतं. वेळीच ते मी Shivaji Sawant..सरांना दाखवले आणि सुधारणा सुचवण्याची विनंती केली. त्यांनी आधी गाणं ऐकलं आणि मग सुधारणाही सुचवल्या. त्याच्या मदतीनी मी हे भाषांतरीत गाणं पोस्ट करत आहे.

मर्डर -२ (ये रात रुक जाए)

ही रात थांबावी, साद थबकावी, तुझ्या बाहुंशी
आस ही रंगवली, तहानल्या ओठी,
स स स स
जाळते मज मी, तुझ्या श्वासांनी
मिठीत ये माझ्या हरवून जा
जाणे काय होईल उद्या
ये जरा
समीप ये बिलगून घे
ये ये जरा
समीप ये बिलगून घे
जगून घे
क्षण हे

ही दुनिया, विसरुनी सर्वही
शरीराच्या पालखीत, मंदमंद श्वास
चालो रात्रभर
पळभर चे आपण हमसफर
आज दोघे इथे आता, जाणे कुठे असू उद्या
काय खबर
ये ये जरा, मजमधे मिळून जा
जाणे काय होईल उद्या
ये जरा
समीप ये बिलगून घे
ये ये जरा
समीप ये बिलगून घे
जगून घे
क्षण हे

मी आहे, स्वप्न मखमली
नयनात ठेव मला
दिला मी रे मोका तुला अनोळखी
हे हे हे
भान हे यावे ना कधी
एकदुसर्यात आता
हरवावी तुझी माझी जिंदगी
स्पंदने ह्रदयी तू छेडून जा
जाणे काय होईल उद्या
ये जरा
समीप ये बिलगून घे
ये ये जरा
समीप ये बिलगून घे
जगून घे
क्षण हे

रात्र थांबावी तुज्या बाहुंशी
मिठीत ये माझ्या हरवून जा
जाणे काय होईल उद्या

ये जरा
समीप ये बिलगून घे
ये ये जरा
समीप ये बिलगून घे
जगून घे
क्षण हे

केदार with Shivaji Sawant sir

sweetsunita66