|| नाही कळला मला ||

Started by Çhèx Thakare, October 16, 2013, 08:23:25 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

||  नाही कळला मला ||
.
.
नाही कळला मला
श्वास माझातला
गुंतूनीया तूझ्यात
जिव नादावला
.
रोमहर्षा परी
भास शब्दांतला
छेडूनी रंग नवे
जिव हा गूंतला
.
स्वप्न माझ्या मनी
तूझेच रे रंगले
तूझीच होऊन मी
तूझ्यात रे गूंतले
.
हळव्या स्पर्शा परी
ऊब ही भासली
होऊनीया एक आज
मीठी हि दाटली
.
नाही कळला मला
श्वास माझ्यातला
गुंतूनीया तूझ्यात
जिव नादावला
.
.
©  Çhex Thakare