मी वेडा...

Started by rahul.patil, October 17, 2013, 10:51:54 PM

Previous topic - Next topic

rahul.patil

वेडावला बाहूला मी तुझा
वाट पाहतोय बेबस होऊन असा
तू बाहुली माझी लाजरी साजरी
कधी येशील ग माझ्या तु जवळी....।

क्षणांना थांबवलंय तुझ्यासाठी मी
मनाला सावरलाय तुझ्यासाठी मी
या वेड्या मनाला आवरायला येणार ना सांग ना
तुझ्यात हरवलोय मी का सांग ना......।

तुझाच विचार का करतो मी हर पल
तुझ्यासाठीच का मरतो मी पल पल
सवाल माझा करतोय मी तुला
तूच जवाब माझा हेच कळतंय मला.....।

एकदाचं पहावंस वाटतंय ग तुला
सांग ना कधी भेटशील ग तु मला
मनाचा माझ्या तुटत चाललाय कडा
सांग ना कधी पाहीन ग मी तुला......।

.                             राहुल रा. पाटील
.                          दि. 4 सप्टेंबर 2013