असा कसा मी?

Started by Tushar Kher, October 22, 2013, 09:15:05 PM

Previous topic - Next topic

Tushar Kher

मी मस्त हसतो  आहे 'फकीर' असून ही !
तो हसू शकत नाहीये श्रीमंत असून ही !!

काय हा रंग जगा च्या राजकारणा चा
मारले मला प्याद्यांनी मी वजीर असून ही !!

माझ्या सर्व सोबती पेक्षा मागे राहून गेलो मी
त्या सर्वां पेक्षा  मी जास्त लायक असून ही !!

डोळ्यां मध्ये एक हि अश्रू येऊ दिले नाही मी
हृदया मध्ये दुःख साठले ले असून ही !!

घेऊन जा माझ्या कडून शुभेच्छा कोणी हि !
लुटवत  आहे हि दौलत मी  पिडीत असून ही  !!

तुषार खेर

मिलिंद कुंभारे