फक्त तुलाच...

Started by शिवाजी सांगळे, October 23, 2013, 12:42:01 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तूझ्यासाठी कविता लिहू म्हटल !
कागदावर शब्दच उमटेना,
रक्त ल्यालो भाळी तूझ्या,
तेंव्हाच सार सुरु झालं !

काय लिहू तूझ्या साठी ?
हे सार, तर तुझच आहे,
धमनीतल्या प्रत्येक थेंबाला,
तुझीच प्रेरणा आहे !

मला कळत नाही...
कशासाठी हे सार ?
वेगळी वाट तूझी – माझी,
त्याच चाकोरीतली... तांबडी,
भेट होईल पुन्हा, वळणावर...
कधी तरी, तेव्हां  मात्र...
सागू नकोस लिहायला कविता,
मी शहारतो, हात थरारतो,

हां, मनातून गोड हसत जा,
निदान काही काळ,
तांबडी वाट दिसेल मला !
चालतो तर आहेच मी...
फक्त तू हसत रहा....



© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +91 9422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे

मनातून गोड हसत जा,
निदान काही काळ,
तांबडी वाट दिसेल मला !
चालतो तर आहेच मी...
फक्त तू हसत रहा....

छान ..... :)

दर्पण दिपक गोनबरे

सुंदर कविता...  ;D

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sumeet shirsonkar


शिवाजी सांगळे

अभिप्रायाबद्धल मन:पूर्वक धन्यवाद ....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९