का करतोस प्रेम माझ्यावर सारखे ती विचारते .........

Started by प्रशांत दादाराव शिंदे, October 29, 2013, 02:31:13 PM

Previous topic - Next topic
का करतोस प्रेम माझ्यावर सारखे ती  विचारते
का तुझीच  ओढ  लावलीस
जागेपणी हि स्वप्न  पाहते तुझेच 
का रे इतके जीव लावलेस....

म्हणालो मी  तेव्हा  सये
जगणे  हे असह्य माझे
कधी  दुख तर सारखे  डोळ्यांत आसवे
स्वप्नभंग  नेहमीच अन नेहमीच मी  एकटे
फक्त  नजरेने होकार  दिलास तू 
मी  तुझ्या  प्रेमात पडलो
फक्त  कपाळावर तुझ्या प्रेमाचे ओठ मी  टेकवले ............

माझ्या ह्या प्रेमाची निशाणी  अंगावर  मी गोंदवले
असेच  सोबत राहा  सये
तूच जगण्याचा आधार  झालीस
सुख काय असतं  प्रिये  तुझ्याच  मिठीत मी अनुभवले ...............
-
©प्रशांत डी शिंदे