" ती " च्या प्रेमाला सलाम

Started by SANJAY M NIKUMBH, November 01, 2013, 06:24:12 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

" ती " च्या प्रेमाला सलाम
=================
चारचौघांसारखं ती हि उमलतांना
कुणीतरी येणार राजकुमार
अशा भावनेत धुंद होणारी
रात्रीच्या गर्भात स्वप्नात रमणारी

दिसायला नेटनेटकी खूप छान
कुणालाही आवडावी अशी
किती भुंगे फेर धरतात
पण पडत नाही कुणाला फशी

अन तो येतो आयुष्यात
तिच्या मनात घर करतो 
तिच्याही नकळत
तो तिचा वाटू लागतो

त्याला तर असतेच आवडलेली
पण बोलणारं तरी कसं
त्याचं अपंगत्व त्याला आड येतं
वाटतं हे जुळणार तरी कसं

पण तिच्या मनातला होकार
त्यालाही कळत जातो
अन त्याच्या मनातल्या भावनांवर
तिचा जीव जडत जातो

एक दिवस जगाच्या विपरीत
असं काही घडूनच जातं
लग्नाच्या बंधनात एकमेकांना
मनापासून स्वीकारलं जातं

तेव्हा हे जग तिला
वेड्यातच काढत असतं
पण माझं मन मात्र
" ती " च्या प्रेमाला सलाम करीत असतं .
=========================     
संजय एम निकुंभ , वसई
दि. १ . ११ . २०१३  वेळ  : ५.४५ स.         

Çhèx Thakare