साधन

Started by विक्रांत, November 01, 2013, 11:02:57 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

करावे साधन |  काय मी ते आता |
तोच करविता |मायबाप ||१
माझे हाती फक्त| बैसने आसनी
कृपा सौदामिनी| करे  सारे ||२
केली धावाधाव| अनंत उपाय |
नच झाली सोय |कधी कुठे ||३
तया त्या कष्टाचे |होऊनिया  चीज |
पावली ती मज |जगदंबा ||४
असे गुरुराव |कृपा शक्ती दाता |
सनाथ अनाथा | केले झणी||५
जन्मो जन्मी पुण्य |केले संपादन |
त्याचे वरदान |लाभियाले ||६

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मिलिंद

विक्रांत,

छान अभंग आहे......


विक्रांत

धन्यवाद मिलिंद