दोन देह आणि एक प्राण असावा.....

Started by kavita.sudar15, November 02, 2013, 07:40:54 PM

Previous topic - Next topic

kavita.sudar15


तु आणि मी अशी कल्पना असावी,
डोक्यावर आसमंत सारा, अन् सुंदरशी सांजरात असावी......
समुद्र किणार्याची वाळू पायांस स्पर्शावी,
वार्याची झुळूक येऊन तुझी लट उडावी.....
अंगावर शहारा यावा, अशी लाट असावी,
नजरेला नजर भिडावी अन् काटोकाट हर्षाने भरणारी पापणी असावी.....
गालावरील ते थेंब टिपणारे ओठ,असा तो क्षण असावा.,
मिठीत माझ्या विरघळताना तुला जगाचा या विसर पडावा......
परतीच्या वाटेवर जाण्याचा मार्ग नसावा,
आयुष्यभरासाठी माझी तू आणि तुझा मी, होऊन एका अतुट लग्न बंधात बांधले जाऊ असा दुग्ध शर्करा योग असावा......
तुझ्यात मी अन् माझ्यात तू असे आपण,
दोन देह आणि एक प्राण असावा.......
दोन देह आणि एक प्राण असावा.......!!!
                 @कviता@

Ankush S. Navghare, Palghar