प्रीत -- चारोळ्या

Started by SANJAY M NIKUMBH, November 03, 2013, 08:15:06 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

       प्रीत   --    चारोळ्या
=====================
काळजाने धाव घेतली काळजाकडे
गंधाने धावं घेतली गंधाकडे
ओढ लागली मनास तुझ्या मनाची
प्रीत उमलली मनी पाहून तुझ्या हृदयाकडे
==========================
नजर एकमेकांत विरघळतांना
हृदयाची भाषा कळत होती
तुझ्या अन माझ्या नकळत
हृदयात प्रीत फुलत होती 
======================
कुणीच नाही केलं प्रेम
तरी मने जुळून गेली
कळले नाही कुणासही
प्रीत कधी उमलून गेली
==================== 
कुठलीच शक्यता नसतांना
मन तुझं होत गेलं
माझं काळीज पाहिल्यावर
तुझ्या मनातही प्रेम उमलून गेलं
====================
काळजावर काळजानं
हृदयावर हृदयानं प्रेम केलं
म्हणून आपल्यात अंतर ठेवूनही
मनात प्रेम अमर राहिलं
======================
तू दूर असूनही
आपल्यात अंतर वाटत नाही
माझ्या श्वासाला तुझा गंध
भेटल्याशिवाय रहात नाही
====================
तुझा दुरावाच तुझ्यात
मनास गुंतवून ठेवतो
अन प्रत्येक क्षण
तुझा होऊन जगत रहातो
=====================
धुंदी या शब्दाचा अर्थ
तुझ्या प्रेमामुळे कळलां
तू भेटलीस म्हणून
हा जीव प्रेमात पडलां
====================
तूच श्वासात असतेस
तूच डोळ्यांस दिसतेस
पहाट , सांज , रात होऊन
जगणं बेधुंद करीत असतेस
-----------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३ . ११ . २०१३     

Çhèx Thakare