दुराव्याने तुझ्या मी, रोजच विव्हळतो...

Started by आपल्यातलाच एक मराठी माणूस..., November 08, 2013, 09:07:44 AM

Previous topic - Next topic

सोडला तू हाथ माझा, अडखळत्या त्या वाटेवर...
एकटाच राहिलो मी, नदीच्या त्या काठावर...

मनाला माझ्या त्या क्षणाला, फक्त तुझीच उणीव होती.....
कठोर मनाला तुझ्या, पण कोठे जाणीव होती...

प्राणी, पक्षी, नदी सर्व, मलाच पाहत होते...
नदीच्या पाण्यासोबत, माझे अश्रूही वाहत होते...

मनाला सारखे वाटल की, तू पुन्हा परत येशील...
हळूवार तो हाथ तुझा, माझ्या हाती देशील...

घडलेस नाही असे काही, फक्त स्वप्नच राहिले...
पुन्हा पुन्हा तेच स्वप्न, ह्या डोळ्यांनी पहिले...

दुराव्याने तुझ्या मी, रोजच विव्हळतो...
मनातल्या आगीचा निखारा, का कधी लवकर निवळतो.

आपल्यातलाच एक मराठी माणूस

मिलिंद रामचंद्र चव्हाण...


मिलिंद कुंभारे



#3
Dhanyawad Mitranoooo,
Pahilich kavita aahe majhi..... aabhari aahe aapala mi