सर्व कविमित्रांस अर्पण…

Started by सतीश भूमकर, November 10, 2013, 11:11:50 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

हे शब्दांशी खेळणारे वेडे
जरा जगावेगळे असतात
एकटक कुणाकडे तरी बघतात
मनात मात्र 'तिचेच' विचार असतात

मधुचंद्र भोगून लोक त्या गोड
गुलाबी मिठीत झोपून जातात
हे मात्र घडलेला प्रसंग कवितेत
उतरवण्यासाठी पुन्हा रात्रभर जागतात

@सतीश भूमकर