'हरवलेलं गाव'

Started by vaibhav_kul2003, November 12, 2013, 07:16:34 AM

Previous topic - Next topic

vaibhav_kul2003

'हरवलेलं गाव'

माझ्या घरातल्या अंगणाला
नाही शेणसडा
गेली तुळस झीजुन 
तया नाही पाणी घडा

नाही शाळा ती पडकी
कुठे दिसत नाही फळा
आता नाही वनभोजन
म्हणून रुसलाय मळा

गेला पार तो खचून
घेतोय निर्जानांच्या झळा
कमी झाली वटपूजा
नाही दोऱ्याचा तो लळा 

गेली पाखर उडून
पडलाय ओसाड हा वाडा
फोडे बुरुज हंबरडा
डोळी  चार चार धारा 

गेल 'जात' अडगळीत
गेला  खुंट्याला तो  तडा
आता दाण्यालाही लागलाय
बघा गीरनीचा ओढा

नाही पडे  शब्द कानी 
"आज वासुदेव आला"
नाही दारावर आता
बघा "गारेगारवाला"
   

वैभव कुलकर्णी