सचिन चे मैदानावरील शेवटचे शब्द (मराठी भाषांतर)

Started by MK ADMIN, November 16, 2013, 11:16:04 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN


22 यार्ड आणि 24 वर्षांच्या माझ्या कारकिर्दीची अखेर होत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहे ती माझे वडील रमेश तेंडुलकर. आयुष्याच्या महत्वाच्या क्षणी त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले. प्रत्येक वेळी जे काही खास केले तेव्हा मी माझी बॅट वडिलांना दाखविली. माझी आई कायम मी तंदुरुस्त रहावे, याकडे लक्ष देत असे. मी जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरवात केली आहे, तेव्हापासून ती माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. लहानपणी क्रिकेट खेळताना मला माझ्या चुलता-चुलतीची खूप मदत झाली, असे कृतज्ञ उदगार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळल्यानंतर आपल्या निरोपाच्या भावुक भाषणात काढले.

माझा मोठा भाऊ नितीन कायम सांगत असे, की जे काही करशील ते संपूर्ण समर्पितपणे कर. माझ्या आयुष्यातील भेट मिळालेली पहिली बॅट माझी बहिण सविताने दिली होती. ती काश्मीर विलोची खास माझ्यासाठी आणली होती. माझा दुसरा भाऊ अजितबद्दल मी काय बोलू. त्याने त्याची कारकिर्द माझ्यासाठी घालविली. त्याच्याशी मी माझ्या फलंदाजीच्या शैलीबाबत कायम चर्चा करत असे आणि तो मला धडे देत असे. काल (शुक्रवारी) रात्रीसुद्धा त्याने माझ्या फलंदाजीविषयी माझ्याशी फोनवर चर्चा केली. 1991 मध्ये माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे अंजली माझ्या आयुष्यात आली.

अंजलीने मला पाठिंबा दिला आणि ती म्हणाली की तू क्रिकेट खेळ, मी कुटुंब संभाळते. त्यामुळे ती कायम माझ्यासोबत राहिली, ते मी कधीच विसरू शकत नाही. मी तिच्यासोबत आयुष्यातील खूप मोठी 'पार्टनरशिप' केली आहे. माझी दोन्ही मुले- सारा आणि अर्जुन यांनी मला खूप समजावून घेतले आहे. मी त्यांना कधीच वेळ देवू शकलो नाही. पण, आता इथून पुढचा वेळ त्यांच्यासाठीच असेल. कुटुंबाबरोबर असणे आणि कायम साथ देणे हे खूप महत्त्वाचे आहे.

माझ्या मित्रांचाही माझ्या कारकिर्दीत मोठा वाटा आहे. ती त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीला वळण लागले ते माझा भाऊ अजितने मला रमाकांत आचरेकर यांना भेटविले तेव्हा. मी त्यावेळी त्यांच्या स्कूटरवरून जाऊन वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळले. आचरेकर सरांनी मला खूप पाठिंबा दिला. मुंबई क्रिकेट संघटनेनेही मला खूप मदत केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही (बीसीसीआय) आभार.

गेल्या 24 वर्षांत मी अनेक वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळलो. राहुल, सौरभ, कुंबळे आणि लक्ष्मण यांच्याबरोबर अनेक सामने खेळलो आहोत. कुटुंबाबाहेर असताना हेच आमचे कुटुंब असायचे. धोनीने मला 200 व्या कसोटीची टोपी देताना मी त्यांना म्हटलो की, तुम्ही भारताचे प्रतिनिधत्व करत आहात. तेव्हा ते विश्वासाने आणि गर्वाने करत रहा. पूर्ण देशाचे तुमच्याकडे लक्ष आहे.

स्टेडियममधील प्रेक्षकांकडून देण्यात येत असलेली 'सचिन...सचिन' ही घोषणा माझ्या आयुष्यावर कानात गुंजत राहिल.

'' सचिन ला आपल्या सर्वांतर्फे पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ''


मिलिंद कुंभारे

'' सचिन ला आपल्या सर्वांतर्फे पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ''

rudra

boss vichar sayam ani nishtha ya kadhihi ek changle vyaktimatva ghadau shaktat he sachin ne aplya khelatil chovis varshacha karkirdit dakhavale aahe.....mi mhanen bat gheun maidanavae sarech nightat parishramhi titkech kartat pan sarech sachin hot nahit...mhanun konihi vyakti kiti unchavar aahe he na pahata tyachya apan unchi gathavi yacha vichar na karta tyachya barobarila tari yeu yacha vichar karava..karan aplyala kahi goshtinch bhan rahat nahi...aso sachin ghadla swthacha mahenatine apan kitpat ahot yacha vichar karava.....

thanx milind....   

rudra

mazha mate milind pratekane apaplya etihasacha badshaha asav...ek sachin asav...

मिलिंद कुंभारे


mazha mate milind pratekane apaplya etihasacha badshaha asav...ek sachin asav...

अगदीच बरोबर आहे ...  :)