प्रेम..........

Started by kavita.sudar15, November 28, 2013, 11:53:49 AM

Previous topic - Next topic

kavita.sudar15

प्रेम त्याचं अन् तिचं,
   त्यांनी रचिलेले भावविश्व स्वपनांच...
मनाचा मनास जोडणारा तो रेशमी बंध,
  आयुष्यभर दरवळत राहनारा कुसुमी गंध.....
अलवार असा थेंब दवाचा,
  हळूवार स्पर्श मोरपिसाचा......
सोबत जगलेला प्रत्येक क्षण,
  आठवणीत एकमेकांच्या गहिवरणारे मनं.
निर्झर झर्यासारखी वाहणारी प्रीत,
जन्मोजन्मीचे सूर जुळावेत असे सुंदर गीत......
अंधार्या राती पडणारे चंद्राचे शीतल चांदणे,
  काहीही न सांगता तिच्या नजरेतील भाव जाणने.....
तिचं अन् त्याचं एकच स्वप्न,
  दोघांनीही एकमेकांस मनापासून जपनं..
आयुष्यभर असेच राहायचे एकत्र,
   मंगलअष्टकाचे गीत गाउन,.
      भावी संसाराचे रेखाटू चित्र......
असेच प्रेमाचे गुढ गुपित,
   तिच्या अन् त्याच्या प्रेमाची दुनिया रंगीत......!!!!! @ कviता @

Çhèx Thakare


Mayur Jadhav