डोक्यात तुझ्याच गणिताचे कोडे....

Started by Mayur Jadhav, November 29, 2013, 11:54:22 AM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

डोक्यात तुझ्याच गणिताचे कोडे
उत्तर तुझ्यावर येऊन अडकावे....
सुटता सुटेना हे गुंतागुंतीचे खेळणे
मग आठवावे तुझे ते लाजिरवाणे हसणे,
तुला दिलेल्या वचनांची आरास कशी करु मी
मग तुझ्यात पाहिलेली स्वप्ने कशी सजवू मी,
डोक्यात तुझ्याच गणिताचे कोडे
उत्तर तुझ्यावर येऊन अडकावे....
नभाच्या मोहक चांदण्यात तुच मला दिसावे
मग माझ्याच पडलेल्या सावलीस तुच मला हसावे,
कधी भेटशील तू मला याचे उत्तर काही कळेना
मग क्षणभर डोळेमिटता तुझ्याशिवाय काहीच मला दिसेना,
डोक्यात तुझ्याच गणिताचे कोडे
उत्तर तुझ्यावर येउन अडकावे....
कसे विसरु मी तुझे समुद्रतिरावरचे मनमोकळे धावणे
मग कितीही बेभान वाहिल्यालाटातरीही तुझी वाजणारी पैंजणे,
आहेत खुप काटेरी कुंपणे आपल्या या मार्गात
मग आपण दोघेही क्षमवू त्यांना आपल्या प्रेमाच्या वेलात,
डोक्यात तुझ्याच गणिताचे कोडे
उत्तर तुझ्यावर येऊन अडकावे....

8888595857,
मयूर जाधव,
कुडाळ (सातारा).

Çhèx Thakare



Mayur Jadhav


dinu.ami

अप्रतिम ओळी लिहिल्या आहेस मित्रा!!!! मस्त झाली आहे कविता  ...।  :) :) :)

chetansp




Mayur Jadhav