खुप बरं वाटतं...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 01, 2013, 01:50:21 PM

Previous topic - Next topic
खुप बरं वाटतं,
तिच्या आठवणीत रमताना,
तिच्या सुखासाठी,
स्वतःला विसरुन जाताना.....

खुप बरं वाटतं,
तिच्या सोबत असताना,
तिच्या कुशीत शिरुन,
तिचा हात हातात घेताना.....

खुप बरं वाटतं,
तिला माझी शोनू म्हणताना,
तिच्या प्रेम अखंड बुडून,
दुराव्यात एकटा तडफडताना.....

खुप बरं वाटतं,
तिला i love u बोलताना,
तिचा तो लाजेने लालबुंद,
होणारा सुंदर चेहरा पाहताना.....

खुप बरं वाटतं,
तिच्या मिठीत विरघळताना,
मनातल्या अबोल भावना,
डोळ्यांनी व्यक्त करताना.....

खुप बरं वाटतं,
तिला माझी प्रियासी संबोधताना,
कधी पिल्लू कधी जानू,
तिला गोड बोलून सतवताना.....

खुप बरं वाटतं,
तिला खुप त्रास देताना,
कडकडून भांडल्यावर,
तिला घट्ट मिठीत कवटाळताना.....

खुप बरं वाटतं,
तिचा हसरा चेहरा पाहताना,
तिच्या गालावरील तो नटखट,
काळा तीळ निहाळताना.....

खुप बरं वाटतं,
कोणी आपलं आहे जाणवताना,
पवित्र प्रेमाच गोड स्वप्न माझं,
सत्यात साकार होताना.....
:-*   :-*   :-*

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ०१-१२-२०१३...
दुपारी ०१,३७...
© सुरेश सोनावणे.....