विरहात तुझ्या झालो मी बाद

Started by lanke.amol, December 02, 2013, 12:28:49 PM

Previous topic - Next topic

lanke.amol

विरहात तुझ्या झालो मी बाद:

जीवास वेड्या, एकच छंद,
मनी अविरत तुझा, सदैव नाद,
ऐकू येई न आता कोणाची हि साद,
विरहात तुझ्या झालो मी बाद.

जुन्या आठवणीत रमतो,मी सहज तासन तास,
नसलीस तू सोबत, तरी दृष्टीस तुझा भास.
ऐकू येई न आता कोणाची हि साद,
विरहात तुझ्या झालो मी बाद.

पहिली भेट, पहिले संवाद, पहिला स्पर्श, पहिले प्रेम,
सोबत आता फक्त आठवणी, आणि miss you ची फोटो फ्रेम.
ऐकू येई न आता कोणाची हि साद,
विरहात तुझ्या झालो मी बाद.

त्या रम्य भेटी, तो सूर्यास्त, त्या बेधुंद समुद्राच्या लाटा,
कोणास होते ग ठाऊक त्या वेळेस, कि वेगळ्या होतील अपुल्या वाटा
ऐकू येई न आता कोणाची हि साद,
विरहात तुझ्या झालो मी बाद.

मनाच्या गाभाऱ्यात रुतली खोल तुझी मोहक सुंदर आकृति,
सांज वेळी जेव्हा साथ सोडे सावली, तेव्हा छळतात तुझ्या स्मृती .
ऐकू येई न आता कोणाची हि साद,
विरहात तुझ्या झालो मी बाद.

नाजूक मधुर सूर तुझे, आज सुद्धा विचारात माझ्या करतात कल्लोळ,
अश्रूंनी भिजून गेली आज काव्याची हि शेवटची ओळ.
ऐकू येई न आता कोणाची हि साद, विरहात तुझ्या झालो मी बाद.

-अमोल लंके

mvd76

अश्रूंनी भिजून गेली आज काव्याची हि शेवटची ओळ.....
Masta!!
Keep it up amol