प्रेमाचं होऊन जगावं

Started by SANJAY M NIKUMBH, December 10, 2013, 05:51:07 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रेमाचं होऊन जगावं
==============
खूप खूप कठीण असतं
प्रेमाचं आयुष्यात येणं
कुणासशी भेटत नाही
प्रेमाचं सुंदर लेणं

प्रेम आयुष्यात आलंच तर
प्रेमाचं होऊन जगावं
फुलांच्या पाकळ्या सारखं
प्रेमास जपत रहावं

फक्त प्रेम अन प्रेम
हेच आयुष्य होऊन जावं
वादळांनाही भीती वाटेल जवळ येण्याची
इतकं प्रेमावर मरावं

मग बघा आयुष्य कसं
सुंदर होऊन जातं
कितीही आले कठीण प्रश्न
उत्तर मिळून जातं

अपेक्षा अन वासनांना 
चार हात दूर ठेवावं
मन निर्मळ झरा झाल्यावर
प्रेमास मिठीत घ्यावं

मग बघां स्वर्ग सुखही
पायाशी लोळण घेतं
एक जीव होऊन जगणं
प्रेममय होऊन जातं .
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३० . ११ . १३ वेळ : ७ .१५ स.       
https://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hl