"जगण्यावरचे प्रेम.....!

Started by samidh251972, December 10, 2013, 02:30:28 PM

Previous topic - Next topic

samidh251972

 जगण्यावर प्रेम कर
असं तू नेहमी सांगतेस
पण .... आज जगणं
खूप महाग झालय ...!
प्रेम करावे तर आधी
खिसा बघतो ....!
तू काल वेणी मागितलीस
किमत पाहून
फक्त फुल आणले ....
पण तू नाही  हिरमुसलीस ....!
दिमाखात फुल केसात माळलस...!
पगाराला वाटा  तरी किती ....?
आईला वाण्याचे बिल द्याचे आहे ...!
बहिणीला फी भरायचे आहे ...!
बाबांची इच्छा कोण विचारतो ....?
त्यानाही केंव्हाची प्यायची आहे..!
घराचं भाडं  भरायचय ... !
महागाई किती ...?
गावी दुष्काळ .....!
बघितलं  इथलं जगणं .....?
किती महाग झालय ......!
आणि तू म्हणते
जगण्यावर प्रेम कर........!
पण तू मात्र जगण्यावर
खूप प्रेम करतेस ...!
जेंव्हा भेटतेस ...
नवा सूर देऊन जातेस ...!
नवी पहाट ....., नवे स्वप्न
फुलवून जातेस .....!
मग  मीही ...
नकळत जगण्यावर
प्रेम करू लागतो
नव्या उमेदिने नवं जीवन जगत राहतो.......!!!!!

                                               "समिधा "

मिलिंद कुंभारे

पण तू मात्र जगण्यावर
खूप प्रेम करतेस ...!
जेंव्हा भेटतेस ...
नवा सूर देऊन जातेस ...!
नवी पहाट ....., नवे स्वप्न
फुलवून जातेस .....!

"समिधा ".....छान ..... :)