अधुरे स्वप्न

Started by मिलिंद कुंभारे, December 11, 2013, 11:16:03 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

अधुरे स्वप्न

आयुष्याच्या  विचित्र  त्या वळणावरती जेव्हा तू भेटली
सत्य एक सांगून गेली, सत्य दुजे मनी दडवून गेली ......

मिलनाची चाहूल लागण्या आधीच दिशा तू बदलली
अन मज हळव्या मनाला एकाकी कशी तू  सोडून गेली......

पाणावलेल्या पापण्या पलीकडे गुपितं सारी तू लपवली
गूढ तुझिया मनीचे न सांगताच, मज तू रडवून गेली ......

कधीकाळी तुजसाठी एक कविता मी होती लिहिली
काळजावर कोरले शब्द माझे, अलगद तू मिटवून गेली ......

आता सरल्या कितीच रात्री, दिसहि कित्येक लोटली
पुन्हा आठवण तुझी अधुऱ्या त्या क्षणांत मज हरवून गेली ......

मिलिंद कुंभारे


sweetsunita66

सुंदर रचना ,,मस्तच !!!!!!

मिलिंद कुंभारे


सतीश भूमकर


KHUPCH CHAAN मिलिंद कुंभारे BHAU :(

मिलिंद कुंभारे

सुरेश, सतीश,

thanks a lot.... :)

niteshk


मिलिंद कुंभारे


Çhèx Thakare

क्या बात है वाह ..

मिलिंद कुंभारे