प्रतीक्षा

Started by Vivek Karandikar, December 14, 2013, 03:40:46 PM

Previous topic - Next topic

Vivek Karandikar

प्रतीक्षा :

तूला भेटल्यावर मला उमगले
इतुकी युगे मी काय शोधिले
मरण ते प्रत्येक युगातील
या जन्मी ते कामी आले

सखे मज तू अशी भेटता
चराचराला आली स्तब्दता
मरण आता सत्वरी यावे
तुझ्या मिठीतच नयन मिटावे

अश्याच या मोहक मोक्षाची
जन्मोजन्मी प्रतीक्षा त्याची
या जन्मी हे घडून जावे
तुझ्या मिठीतच मरण यावे

...

विवेक