खडतर ह्या जीवनांत

Started by Sadhanaa, December 15, 2013, 04:08:48 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

खडतर ह्या जीवनांत

मी माझा राहिलो नाहीं

हालचाल करत असून

माझ्या मध्ये जीवन नाहीं ।


जीवनांतील प्राण तो

केव्हांच उडून गेला आहे

दूर तो सखी भोंवती

पिंगा सारखा घालत आहे ।


प्राण असतो हृदयांतील

प्रीतिमध्ये गुंफलेला

प्रीतच जर राहिली नाहीं

तर त्यांस काय अर्थ उरला ।


जीवनाला अर्थ नाहीं

माझा मी राहिलो नाहीं

मला वाटते म्हणूनच

मी जिवंत राहिलो नाहीं । ।रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास...Please click on this..
http://www.kaviravi.com/2013/06/sad-poem_27.html