तिच्या आठवणींचा पाऊस धो धो पडत होता

Started by vikrantborse, December 24, 2013, 01:17:41 AM

Previous topic - Next topic

vikrantborse

तिच्या आठवणींचा पाऊस धो धो पडत होता

तिच्या आठवणींचा पाऊस धो धो पडत होता
दुर्लक्ष करत होतो मी, पण तो चिंब चिंब भिजवत होता.
राहावेनास झाल मला, मग हळूच जाऊन म्हटलो मी त्याला,
"काय रे बाबा!! आज कशी काय आठवण काढलीस?"
तो हसला आणि म्हंटला,"आठवण काढलीस? आठवण काढायला तू मला विसरलाच कुठे होता."
तिच्या आठवणींचा पाऊस आज धो धो पडत होता.
मी गेलो सोडून त्याला, पण तो मागे मागे येत होता.
मी थांबलो, वळलो आणि म्हंटल त्याला, " चल मान्य आहे सार मला. पण मग इतके दिवस तू कोणत्या ढगात लपून होता."
तो पुन्हा हसला आणि म्हंटला,"मी? लपून? उलट तूच मला विसरण्याच नाटक करून माझ्याशीच लपंडाव खेळत होता."
तिच्या आठवणींचा पाऊस आज धो धो पडत होता.
मी क्षमत होतो हळू हळू त्याला, आणि तो सार खर खर बोलत होता.
मग, कळेनास झाल त्याला, तो हलकेच येउन म्हंटला मला,
"काय रे बाबा!! काय झाल?" माझा चेहरा जरा उदासीन होता.
मी हसलो आणि म्हटलो, " काय झाल? प्रेम केल."
माझ्या डोळ्यातून जलधारा मंद मंद वाहत होत्या
आणि.....
तिच्या आठवणींचा पाऊस आता चिंब चिंब भिजत होता
तिच्या आठवणींचा पाऊस आता चिंब चिंब भिजत होता.
खरच......
तिच्या आठवणींचा पाऊस धो धो पडत होता.
--रत्नप्रवि--