तू आलीस

Started by vikrantborse, December 24, 2013, 01:25:38 AM

Previous topic - Next topic

vikrantborse

तू आलीस
एकाकी जीवन माझे, तू सोबत होऊनी आलीस.
प्रवास खडतर होता, तू आधार होऊनी आलीस.
दिवस मालवू पाहता, तू सकाळ होऊनी आलीस.
काळोख दाटुनी येता, तू प्रकाश होऊनी आलीस.
दुखः साचुनी राहता, तू आनंद होऊनी आलीस.
डोळे भरुनी येता, तू स्मित होऊनी आलीस.
आयुष्य अपूर्ण माझे, तू पूर्तता होऊनी आलीस.
आयुष्य पुसुनी जाता मग, तू अर्थ होऊनी उरलीस.
सरणाच्या वाटेवरती तू तृप्तता होऊनी स्मरलीस.
संपला प्रवास माझा तू मज जे घेण्या आलीस.
--रत्नप्रवि--