जिवंतपणी मरण भोगणार आहे मी.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 24, 2013, 10:26:41 AM

Previous topic - Next topic
आज माझी चिता जळणार आहे,
आता मरणार आहे मी.....

तिरडीवर माझ्या सुंगधी फुलांन ऐवजी,
काटेच काटे सजवणार आहे मी.....

नाही होणार कुणाला त्रास माझा,
स्वतःला संपवणार आहे मी.....

नाही लागणार कुणाचाच काही,
अस्थित्व माझे मिटवणार आहे मी.....

आवर घालेल माझ्या भावनांना,
ह्रदयाला माझ्या तोडणार आहे मी.....

नाही करणार पुन्हा प्रेम कुणावर,
मनाला माझ्या दगडाच करणार आहे मी.....

नाही उरवणार कुठेच स्वतःला,
सरणावर शेवटचा श्वास घेणार आहे मी.....

अखेरचा निरोप घेईल या जगाचा,
जिवंतपणी मरण भोगणार आहे मी.....

जिवंतपणी मरण भोगणार आहे मी.....
:'(   :'(   :'(   :'(   :'(

_____/)___/)______./­­¯"""/­­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­­\)

स्वलिखित -
दिनांक २३-१२-२०१३...
मध्यरात्री ०१,१९...
© सुरेश सोनावणे.....

Dashrath

जिवंतपणी मरण भोगणार आहे मी.....

by- Dashrath wahule

आज माझी चिता जळणार आहे,
आता मरणार आहे मी.....
तिरडीवर माझ्या सुंगधी फुलांन ऐवजी,
काटेच काटे सजवणार आहे मी.....
नाही होणार कुणाला त्रास माझा,
स्वतःला संपवणार आहे मी.....
नाही लागणार कुणाचाच काही,
अस्थित्व माझे मिटवणार आहे मी.....
आवर घालेल माझ्या भावनांना,
ह्रदयाला माझ्या तोडणार आहे मी.....
नाही करणार पुन्हा प्रेम कुणावर,
मनाला माझ्या दगडाच करणार आहे मी.....
नाही उरवणार कुठेच स्वतःला,
सरणावर शेवटचा श्वास घेणार आहे मी.....
अखेरचा निरोप घेईल या जगाचा,
जिवंतपणी मरण भोगणार आहे मी.....
जिवंतपणी मरण भोगणार आहे मी.....

अरुण

तिरडीवर माझ्या सुंगधी फुलांऐवजी,
काटेच काटे सजवणार आहे मी.....

नका विचारू मला शंका तुमची -
निजल्यावर मी तिरडीवरती
सजवणार कसा मी आपल्यालाच?
.
.
.

अखेरचा निरोप घेईन या जगाचा,
जिवंतपणी मरण भोगणार आहे मी.....

नका विचारू तुमची दुसरी शंका -
कोण भोगते मेल्यानंतर मरण?
ढाळा अश्रू वाचून माझ्या कविता करुण.

अरुण

जाऊन आहारी अतिरेकी भावनांच्या
भोगणे "जिवंतपणी" मरण
आणि पोस्ट करत बसणे रडगाणे
"जिवंतपणी मरण भोगण्याचे"
ह्यात शहाणपणाचा भाग
शून्य असे.