आठवणींचे वारे

Started by दर्पण दिपक गोनबरे, December 25, 2013, 09:48:20 AM

Previous topic - Next topic

दर्पण दिपक गोनबरे

आठवणींचे वारे

वहातायत आजही
आठवणींचे वारे
सुंदर क्षण ते
आयुष्याचे सारे

खांद्यावर आजही
आठवणींचे ओझे
भार पेलेना
आठवण थांबेना

मावळला सुर्य
संपले पर्व
तीन वर्षांचा काळ
नयन जणू पावसाळी आभाळ 

दहा प्रतिमा आपण
जग जिंकूया
कधी गिरी प्रेमी क्षणभर
पुढे सुख-दुखांचे डोंगर

वाढदिवस एकमेकांचे
हृदयी सदैव
स्वप्नातच का होईना
भेटूया निवांत

भविष्यात प्रतिष्टीत 
नागरिक महणून जगूया
मैत्रीच्या आठवणीत, आजही. . .
वहातायत वारे. . . वहातायत वारे!!!


© गोनबरे दर्पण
gonbaredarpan@gmail.com
8286680651

शिवाजी सांगळे

दर्पण, कवितेतील भावना छानच आहेत, फक्त यमक वगैरे नीट बांधली तर गोडी अजून वाढेल... याची काळजी जरूर घे!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

दर्पण दिपक गोनबरे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :) आणी कविता लिहिताना नक्कीच या गोष्टींची काळजी घेईन

शिवाजी सांगळे

अरे, खूप दिवस भेटला नाहीस.... ?
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९