एक गुलाब मी दारी माझ्या लावला

Started by सतीश भूमकर, December 27, 2013, 12:54:17 AM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

एक गुलाब मी
दारी माझ्या लावला
ऊन-पावसापासून वाचवत
जीवापाड मी जपला...

तरी न जाणे का तो,
पिवळ्या पाणातच जखडला
अन आजपर्यंत एकही
गुलाब त्यावर न बहरला...

पण आज बागेत आली
माझी सोनपरी फुलं वेचायला
अन जाता-जाता स्पर्शून
गेली त्या सुकलेल्या झाडाला....

दुसऱ्या दिवशी पहाटे
मग चमत्कार झाला,
अन तिच्या नुसत्या स्पर्शाने
सुकलेला गुलाब बहरून आला.

पण आता तीच सोडून
गेली मला एकट्याला,
फक्त आठवण म्हणून उरलाय
दारात तो गुलाब जळालेला....

@सतीश भूमकर