आत्मा हा अमर असतो

Started by Sadhanaa, December 30, 2013, 05:43:01 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

आत्मा हा अमर असतो
हींच आम्हाला शिकवण आहे
त्यावर विश्वास नव्हता
पण आज ते पटले आहे
सखी मला सोडून गेली
अनंतात विलीन पावली
तरी तिची प्रेमळ सावली
माझ्या भोवती फिरते आहे
चमकलेल्या विचारातून
आठवणींच्या रूपांतून
तसेच कधीं स्वप्नांमधून
जीवनाचा मार्ग दाखवित आहे
मन उदास झाले असतां
जीवन भकास वाटत असतं
तसेच संकट समोर दिसतां
ती साथ करीत आहे
म्हणून आत्म्याच्या अमत्वाची
जाणीव मला झाली आहे
विश्वास वाटत नव्हता पण
त्यातील सत्य पटले आहे ..
                              रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/07/inspirational-poem.html