तुलाही प्रेम होतेय का...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 31, 2013, 06:32:37 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

माझा एक प्रश्न आहे
त्याचे उत्तर देशील का...??

माझ्या मनात जे होतेय
तुलाही तेच होतेय का
हृदय माझे तुझ्यासाठी
तुझेही धडधडतेय का

मला झोप येत नाही
तुलाही जागरण होतेय का
स्वप्नांत माझ्या येतेस तु
तुलाही स्वप्न येतेय का

सतत आनंदी असते मन
तुझेही हृदय हसतेय का
दिवस खुप सुखात जातो
तुलाही सुख मिळतेय का

मनाला पडतात खुप प्रश्न
तुलाही प्रश्न पडतात का
माझे जग बदलतेय तसे
तुझेही ते बदलतेय का

सतत तुझी आठवण येते
तुलाही माझी येतेय का
वाटते प्रेम होतेय मला
तुलाही प्रेम होतेय का...
तुलाही प्रेम होतेय का...

... अंकुश नवघरे
... Ankush Navghare.