तू आलीस जीवनात

Started by SANJAY M NIKUMBH, January 06, 2014, 07:33:00 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

        ==२८ डिसेंबर ===
लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने
माझ्या प्रेयसीस लिहिलेली हि कविता
========================
तू आलीस जीवनात
----------------------
तू आलीस जीवनात
जगण्याचा अर्थ कळत गेला
तुझ्या पदस्पर्शाने
संसार फुलत गेला

माझ्या जीवनास सुखाचा
मोहर येत गेला
तुझ्या गंधाने मनाचा
मोगरा बहरत गेला

सहवास तुझा लाभता
मी तुझा होत गेला
तुझ्या रुपात चंद्र
माझ्या अंगणी आला

उजळले भाग्य माझे
तुझ्यासम सखा मज मिळाला
होता रिकामा प्याला
प्रेमाने तुझ्या भरला

वेलीवर दोन फुले उमलून
संसार सुखाचा झाला
प्रत्येक जन्मी मागतो
दान तुझे देवाला .
-----------------------------------
संजय एम निकुंभ , वसई