जाग येऊ दे

Started by madhurprem, January 07, 2014, 12:52:51 AM

Previous topic - Next topic

madhurprem

खूप सोसलेस तू दुनियेचे तिरस्कार
उठ आता जणू म्यानातील तलवार
जगू नको होऊन प्रतिमा वैराग्याची
वेळ हीच आहे स्त्रीत्वाच्या संकलनाची
ज्या समाजाचे पोथीवाद तू आजवर मानले
कापून टाक ते हात ज्यांनी अब्रूला तुझ्या ताणले
झेप घेऊन चेव आलेल्या वाघीनिवणी
समाजाच्या छातीवर लिही सचेतन स्त्रीत्वाची कहाणी
डागाळलेला पदर तुझा समाजाच्या चिखलानी
कर्तुत्वाचे नीर तुझ्या टाकेल त्यास क्षाळूनि
तुझ्या पवित्रतेवर हैवानी लोचनांना
नष्ट कर अक्षातील अग्नीने त्या दृष्टजनांना
फोडून टाक बांगडया तुला बांधून ठेवणाऱ्या
खांबिर कर आता पावलांना डगमगणाऱ्या
जाग येऊ पुन्हा एकदा इतिहासातील तुझ्या रुपाला
जागृकतेच तेल दे स्त्रीत्वाच्या विझत्या दिव्याला.
         
प्रेमानंद जाधव