आभास हा..

Started by amolbarve, January 09, 2014, 10:16:14 PM

Previous topic - Next topic

amolbarve

*माझी कविता *
  *आभास हा..*
स्वप्नवेड्या काळराती ,
ती मला रे खुणवत होती
नशिबाची रे गाठ बांधाया,
ती मला रे विनवत होती

चांद्वेडा चांदणीला ,
असा कसा हा पाहत होता
रातकिड्याच्या तेजाला ही,
सूर्याचा रे भास होता

अन अचानक शिरावरती,
माऊलीचा हात होता
उघड्या जगाच्या भाऊगर्दीत,
स्वप्ना-वलीचा आभास होता

-अमोल सुभाष बर्वे

kuldeep p

मस्त मित्रा ........