असच हरवून जाऊदे तुझ्यात....

Started by suchitra shedge, January 18, 2014, 11:54:19 AM

Previous topic - Next topic

suchitra shedge

असच हरवून जाऊदे तुझ्यात....
कधी तुझ्या गहिरया डोळ्यांत...
तर कधी तुझ्या त्या उबदार स्पर्शात....

असेच गुंफूदे ओठ एकमेकांत...
कधी धुक्यात पडणारया दवबिंदूत
आपला ओलावा शोधणाऱ्या पात्याप्रमाणे...
तर कधी स्पंदने वाढवून एकमेकांना
खेचून घेणाऱ्या चुंबकाप्रमाणे....

असेच राहूदे स्वप्न डोळ्यांत...
कधी एकमेकांसोबत प्रेम उधळत...
तर कधी उगाच एकमेकांना वाकुल्या दाखवत...

अशीच राहूदे साथ तुझी...
कधी हात हातात धरून तोल सावरत ...
तर कधी बाहूत घेऊन प्रेम उधळत....

असाच होवूदेत स्पर्श तुझा....
कधी अंगावर नवीन रोमांच उभारत..
तर कधी नकळत हृदयाची धडधड वाढवत....

असेच जुळूदे बंध आपल्या गोड नात्याचे...
कधी एकमेकांना भरभरून सुख देत
तर कधी एकमेकांचे दुखः वाटून घेत....

तुझ्या प्रीतीत असच मला पूर्णपणे रंगून जाऊदे...
असच मला पूर्णपणे रंगून जाऊदे...

:-*  :-*  :-* :-* :-* :-*

- Suचित्रा Sheडगे

Amol Baldi

हाय
सुचित्रा मी तुझ्या सर्व कविता फार काळजीपूर्वक वाचतो आणि वाचत राहील ....
मला आता फील हुऊ लागले आहे म्हणून वाटले कि तुला आज लिहावे म्हणून लिहिले
काय आपण एमैल वर चाट करू शकतो........!!!!
बघ तुझी इच्छा असेल तर.
thanks
वाट बघतोय.

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]