|| प्रेम म्हणजे, प्रेम असतं ||

Started by Çhèx Thakare, January 26, 2014, 03:47:12 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

||  प्रेम म्हणजे,  प्रेम असतं ||
.
.
प्रेम म्हणजे, प्रेम असतं
यात दोघांपैकी कोणा एकाच
मरण माञ सेम असतं
.
विरहात कोण किती मुरेल
याचा काही नेम नसतो
पण
अठवणीत राञभर जागणे
हे माञ प्रत्येकाच सेम असतं
.
हे वाचताना थोड हसू येईल
पापण्यात माञ आसूच येईल
तिची किवा त्याची  एकदा अठवण येईल
तरी सुद्धा मनात माञ हसूच येईल
.
तो पाठवलेला मेसेज मी पुन्हा पुन्हा वाचणार
आता मेसेज करत नाही म्हणून
एकदा तरी तिला मेसेज करणार
.
समोरच्याला आनंदी ठेवण्यासाठीच
काम आपलं खुप मेन असतं
दिवसा परी समोरच्याचा स्वप्नांमधे जगणं हे माञ प्रत्येकाच सेम असतं
.
म्हणून मी सांगतोच कि हो ..
.
प्रेम म्हणजे प्रेम असत
दोघांपैकी कोणा एकाच मरण माञ यात सेम असतं
.
यात शिकार कोणी एक होईल
याचा माञ काही नेम नसतो
पण शिकार नक्की होईल
हे माञ अगदी सेम असतं
.
प्रेम ....!
प्रेम तर खरं मिच केलं 
अस बोलणारी मंडळी खुप भेटते
पण प्रेमात दुख: मी खुप सोसलं
अस "न" सांगण कोणाला  ?
हे माञ प्रत्येकाच सेम असतं
.
पावसात
ती भिजली, अन तो ही भिजला
आनंद पावसाचा दोघांनी लुटला
प्रेमाची पतंग खुप ऊंचावर तिच्यासोबत नेली
पण ती सोडून गेली   
अन ..
साला तो पतंगच कि हो तूटला ..
.
अर्ध चाँकलेट तिन खाल्लं,  अर्ध चाँकलेट मी खाल्लं
थोड मी तिच्या सोबत फिरलो 
अन
थोड ती माझ्या सोबत फिरली
फिरताना जेवण दोघांनी केलं जेवताना कधी
न तिच कुठे अडल
न माझ कुठे अडल
पण
बिल माञ दोघांच नेहमीच माझ्या नावाने फाडलं
.
प्रेम म्हणजे प्रेम असतं
नेहमी मरण माझ होणार
हे माञ अगदीच सेम असतं ...
.
प्रेमाचा अनूभव सर्वांच्या नशिबी येणं
असं माञ कधी सेम नसतं
पण प्रेमासारखा प्रिय अनुभव जगात कुठेही नाही
हे माञ अगदीच सेमं असतं
.
.
©  चेतन ठाकरे 
( सदर कविता मी पाडगावकरांच्या "प्रेम म्हणजे प्रेम असतं" या कविते वरून बनवलेली आहे.  सदर कविता विरह कविता म्हणून वाचकांनी वाचावी हि नम्र विनंती.  चुक भूल माफ करावी. )