टोपी उंदीरमामांची ....

Started by shashaank, January 27, 2014, 09:49:40 AM

Previous topic - Next topic

shashaank

टोपी उंदीरमामांची ....

उंदीरमामा पिटकु छान
इवलेसे नाजुक कान

कस्से पहा ऐटीत चाल्ले
वाटेत छोटे कापड दिसले

घेऊन कापड टाण टाण
गाठले शिंप्याचे दुकान

"शिंपीदादा तुम्ही महान
शिवा जरा टोपी छान..."

"गोंडा लावा अस्सा न्यारा
म्हाराजांचा उतरेल तोरा.."

टोपी घालून गोंडेदार
गळ्यात ढोल बोंगेदार
मामा करती हा पुकार -----

ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
टोपी माझी दिमाखदार
राजमुगुट फिका पार

राजा म्हणे -"कोण तो
माझ्यासमोर गरजतो ??"

"काढून आणा त्याची टोपी
मोडेल त्याची मिजास मोठी.."

ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
राजा कस्ला भिकार्डा
टोपीसाठी कर्तोय ओर्डा

"द्या रे परत टोपी त्याची
दाखवा त्याला वाट घरची.."

ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
राजा कसा भ्यायला
लागला टोपी द्यायला

शिपाई धावती मामांमागे
मामा घुसले बिळात वेगे

ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक
मामा हसती मिशीत कसे
राजाचे झाले हसे.........


-shashaank purandare.

मिलिंद कुंभारे