साजणी

Started by AnamikaDhorje, January 28, 2014, 08:12:37 PM

Previous topic - Next topic

AnamikaDhorje

चोरू नको नजर
काहीतरी होतंय
कस सांगू तुला
हृदय घायाळ होतंय ||
लाजू नको अशी
कावरी बावरी जशी
ठोका हृदयाचा चुके
तुझा पदर रेशमी ||
झुळूक तुझ्या केसांची
चेहऱ्यावर पसरू दे
सौंदर्य पाहून तुझे
मन तृप्त होऊ दे ||
मारू नको असा
तोऱ्यामध्ये हेका
चुकतो आहे माझ्या
काळजाचा ठोका ||
तुझ्यासाठी जिणे
तुझ्यासाठी मरणे
हेच तुला सांगणे
ग सखे साजणे.....
हेच तुला सांगणे
ग सखे साजणे.....





(Copyrights: Anamika Dhorje)

मिलिंद कुंभारे


AnamikaDhorje


sweetsunita66


vijaya kelkar

छान ग अनामिके , छान ग सखे

AnamikaDhorje


AnamikaDhorje


केदार मेहेंदळे


AnamikaDhorje


kishor pattil