लहानश्या सखीस...

Started by विक्रांत, January 29, 2014, 08:10:07 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

या वळणावर जीवनाच्या
संभ्रमित झालेली ती
त्याच्यासाठी वाटेवर
डोळे लावून बसली होती

इथे तिथे उगाच मना
रिझवू पाहत होती
आशा निराशा विचार वादळ
बाटलीत बंद करू पाहत होती

तिचेच होते सारे पण
तिला मिळत नव्हते
रुढीच्या दृढ विळख्यात
स्वप्न जखडले होते

शस्त्र त्याच्या हाती होते
पथ त्याला माहित होते
का थरथरती हात त्याचे
तिला कळत नव्हते

दूरदूर वर घरापासून
जगाशी ती लढत होती
त्याच्या स्मृतीत मग्न
तरीही एकटीच होती

माझे शब्द तिच्या साठी
बळ एकवटत होते
लहानश्या सखीस माझ्या
लढ म्हणत होते

विक्रांत प्रभाकर