|| वेळ ||

Started by Çhèx Thakare, February 05, 2014, 04:06:31 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

||  वेळ ...  ||
.
.
योग्य वेळी विचारेन म्हणतो
पण
ती वेळ माञ कधी येत नाही ..
माझ्या नशिबी तुझ्या प्रेमाचा
तो खेळ माञ कधी येत नाही ..
.
.
योग्य वेळी भेटेल म्हणतो
पण
ती भेट माञ कधी होत नाही
तुझ्या चाहुली ने पाऊले माझी
लेट माञ कधी होत नाही
.
.
तुझ्या साठी लिहू म्हणतो
पण
कागद माञ काही पुरत नाही
तु माञ पुरून ऊरते
पण तुझ्या अठवणी माञ ऊरत नाही
.
.
बोलायची खुप हिम्मत करतो
पण
शब्द ओठांवरती काही येत नाही
चुकून ओठांवरती आले तरी
तुझ्या कानां पर्यंत ते काय जात नाही
.
.
तुझ्या साठी रोज नटून असतो
पण
तू माञ काय पाहत नाही
लपून जर कधी पाहिले तरी
तुझ्या समोर आल्या शिवाय मला राहवत नाही
.
.
मी हे सर्व तुझ्यासाठी करतो
तुला यातलं काही कसं पाहवत नाही
का तू ?  जाणून असते सर्व काही
पण
मला छळल्या शिवाय तूला काही राहवत नाही ?
.
.
©  चेतन ठाकरे