तुझ्या घरुन निघताना

Started by कवी-गणेश साळुंखे, February 07, 2014, 02:57:03 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* तुझ्या घरुन निघताना *
प्रेमाचे गाव उद्ध्वस्त झाले होते
डाव तुझेच ते रंगले होते
तुझ्या घरुन निघताना सखे
पाय माझेच मला रोखत होते

डोळ्यांत माझे वादळ उठले होते
म्हणुनच मी पापण्यांना मिटले होते
बरसण्यासाठी अश्रुं लढत होते
चेह-याने माझे त्यांना लपवले होते

तुझ्या घरच्या एकेक पाय-या उतरताना
तुझेच शब्द सारे आठवत होते
मी तुला कधीच फसवणार नाही
आज तु मला खरच फसवले होते

वाटलं होते तु थांबवशील मला
म्हणुन मागे वळुन मी बघत होतो
कि हे सारे एक दुःस्वप्न असावे
पण सत्याने आपले रुप दाखवले होते.
कवी-गणेश साळुंखे...!
A/p - Marwad Tal-Amalner- dist - Jalgaon
Mobile -8108368222