पावसाळा

Started by sunitav, February 09, 2014, 12:26:37 PM

Previous topic - Next topic

sunitav

   माझे ओले अंग ,तुझी ती नजर
संकोचलेली मी ,आसुसलेला तू

मी षोडशा, मिसरूड फुटलेला तू
हवाहवासा असा तो क्षण जगणारी मी ,
अन त्या क्षणाला पकडून ठेवणारा तू

पावसाच्या सरित चिंब भिजणारी मी
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा तू

आजही आठवतो मज तो पावसाळा
अन तुझी ती नजर

आजही जेवा कोसळतात सरी
तेवा वाढते उगाच धडधड उरी .

                     .......सुनिता .