ती

Started by Swapnil.jagtap, February 09, 2014, 09:45:03 PM

Previous topic - Next topic

Swapnil.jagtap

        ती
ती आली समोर तर भीती वाटायला लागते
असे वाटते माझे प्रेम मलाच समजवायला लागते
किती झालो वेडा मे तिच्या नजरेपूढे
तिला कधी कळेल हो प्रेम आहेच वेडे खुळे ||

माझ तिच्यावर प्रेम आहे तिलाही माहीत आहे
पण तिला न जाणे कोणते संकट आहे
तिला जेव्हा हे प्रेम समजेल,तेव्हा वेळ गेलेली असेल
काळाच्या ओघात सर्व मागे गेलेले असेल ||

ती आली समोर तर भीती वाटायला लागते
असे वाटते माझे प्रेम मलाच समजवायला लागते
माझे मन लागत नाही ती दिसल्याशिवाय हल्ली
ती नेमकं बघते मला मी होतो जेव्हा टल्ली ||

तिचे ते हास्य बघून मी वेडा होऊन जातो
काय कराव कळत नाही खुळा होऊन जातो
तिच्या डोंळ्यात साफ मला माझ्यासाठीच प्रेम दिसत
पण तरीही ती का सांगत नाही याचच खूप दूख वाटत ||
                                                    कवीta
                                        स्वप्ंनिल दिलीप जगताप