अशीच एकटी बसलेली असताना...

Started by suchitra shedge, February 11, 2014, 10:34:09 AM

Previous topic - Next topic

suchitra shedge

अशीच एकटी बसलेली असताना...
नकळत गार वारा मनाच्या तारा छेडून गेला....
अन तुझ्या रेशमी स्पर्शाची जाणीव करून गेला..

अशीच एकटी बसलेली असताना....
कोणा जोडप्याला मस्ती करताना बघितलं...
अन तुझा तो खट्याळ चेहरा डोळ्यांसमोर आला...

अशीच एकटी बसलेली असताना...
मला नजरेला नजर भिडवता येत नाही हे पाहून
पण प्रेमान चेहरा धरून नजरेत बघायला लावणारा तू आठवला...

अशीच एकटी बसलेली असताना...
तुझ्या त्या मधाळ शब्दांनी कांनांमध्ये गर्दी केली...
अन अचानक एक प्रेमळ शब्द पटकन ओठांवर आला...

...

खरं सांगायचं झालं तर ...
तुझ्या प्रत्येक छोट्या गोष्टी मनात घर करून जातात...

तुझ्या हसण्याने खूप आनंदी झाल्यासारखं वाटत...
जणू काही अंगावर पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरी सारखं...

सगळं काही खूप सुंदर होऊन जातं...
अगदी गोष्टीतल्या सिंड्रेला सारखं...

अशीच एकटी बसलेली असताना...
हेच सगळं आठवतं अन अचानक ओठांवर हसू येत...

हेच सगळं आठवतं अन अचानक ओठांवर हसू येत...

- Suचित्रा Sheडगे

:)  :)  :)  ;)  ;)  ;)