पाप

Started by कवी-गणेश साळुंखे, February 14, 2014, 11:51:48 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कवी म्हणुन घेण्यात अर्थच राहिला नाही
खरंच हो अजुन मला काहीच येत नाही
शब्द कधी जुळतात तर कधी जुळत नाही
जे आठवतं तेव्हा ते कागदावर उतरत नाही

जीवन कसे आहे ते अजुन कळलेच नाही
एवढ्याशा बालपणास मोठंपण ते आलंच नाही
ज्याला कळत सारं ते शहाण्यासारखे वागत नाही
शहाणपण येतं ज्याला लोक त्याच ऐकत नाही

खेळतात असे खेळ जे कधीच संपत नाही
डावातल्या सोंगट्याना मनाप्रमाणे खेळता येत नाही
आपलेच लुटतात आपल्याला परके आपलेसे होत नाही
विश्वासाचे कच्चे धागे तुटल्यावाचुन राहत नाही

ओळखतात क्षणात दुस-याला स्वतास ते ओळखत नाही
पापी म्हणतात निष्पापाला पुण्ये त्यांची दिसत नाही
दगडं मारतात जी एखाद्या जीवाला इथे
जणु पाप कधी आयुष्यात त्याने केलंच नाही.
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222