तुझ्या सुंदर सहवासात मज खूप जगायचे आहे.......

Started by kavita.sudar15, February 18, 2014, 04:08:06 PM

Previous topic - Next topic

kavita.sudar15

आठवते का तुला, तुझे ते चोरून पाहणे मला,
  माझ्यासोबत दोन शब्द बोलण्यासाठी होणारी तुझी धडपड......,
   खर सांगू मन माझे हि व्याकूळ व्हायचे तुला पाहायला......!!!!
त्यावेळी मलाही असेच वाटायचे,
  पण लाजाळूच्या झाडापरी मी लाजायचे.....
पण एक सांगू तुला, तू आधी विचारावेस असेच वाटायचे मला,
  तेही क्षण आजही आठवतात मला अन तुला.......
त्या क्षणांना तू माझ्या आयुष्याचे सोबती बनवलेस,
  माझ्याशी लग्न करून तू मला स्वताचे नाव दिलेस......
तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचे आहे,
  तुझ्या प्रत्येक सुख दुखात तुझेच बनून राहायचे आहे......
तुझ्याच नावाचे कुंकू भाळी लावायचे आहे,
या जन्मात नव्हे तर पुढील सात जन्म तुझेच व्हायचे आहे.......
प्रेम तुझे माझे कधी लपलेले, कधी मनात दडलेले,
  आणि आता सार्या जगासमोर मांडलेले.......
संसाराची हि सुरुवात तुझ्या सहवासाने गोड झाली,
  माझ्या आयुष्यातील प्रत्येक चाहूल तुझी झाली.......
गोड या स्वप्नांना या पापण्यात लपवायचे आहे,
  तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे......!!!!
  तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे.........!!!! @ कविता @
 


नामदेव क्षीरसागर

तिने त्याच्या सोबत केवळ हाच जन्म नव्हे तर सात जन्म सोबत जगण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हेच तर या संस्कृतीचे वैशिष्ठ्य ! अर्थात या भावनेची जपणूक 'त्याने' या आयुष्यात तरी परोपरीने प्रामाणिकपणे केली जाईल असाच विश्वास तिला वाटतोय, हे खरे ना ?
जीवनाच्या आरंभापासून अंतापर्यन्त आपणास खूप मित्र-मैत्रिणी भेटतात. चांगले मित्र मिळणं हे प्रारब्धात असायला हवं ! ते टिकवणं मात्र आपल्या वागण्यावर ज्अवलंबून असते. "व्यसने मित्र परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे भवति " या उक्ती प्रमाणे संकटकाळी घात करणारे मित्र त्यागायलाच हवेत.
त्यानं आणि तिनं केवळ जीवनसाथीच नव्हे तर मैत्रीचंही नातं जपायला हवं !