टीचभर पोटासाठी -भाग - २

Started by सतीश भूमकर, February 20, 2014, 08:06:35 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

भाग - २...

[टीचभर पोटासाठी या कथेचा हा दुसरा भाग आहे हा वाचण्या आगोदर पहिला भाग वाचा ]

जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या घशाला कोरड पडली होती. अंगावर झालेल्या जखमांची आग-आग होत होती. यामुळे ती ओक्साबोक्शी रडत होती. मग अचानक बंद असलेला दरवाजा उघडला आणि तो साहेब व एक बाई आतमध्ये आले. मग त्यांच्यामध्ये बोलाचाली सुरु झाली, साहेब म्हणाला " पच्चीस हजार के नीचे नाही दुंगा" मग बाई रागारागात म्हणाली " अरे इसको कायको पच्चीस हजार रे,ये थोडी नई है तुने भी तो मजे मार लिये इसपे, बीस हजार मे फायनल करदे" आणि मग तिने त्या साहेबाला पैसे दिले आणि दोन मानसं आली आणि तिला उचलून घेऊन गेली.

नेमकं आपल्या आयुष्यात घडतंय काय ? याची कसलीच खबर आधी तिला लागत नव्हती. पण आता तिला कळून चुकल होत कि त्या साहेबाने आपल्याला फसवून या बाईला पंचवीस हजारात विकलं होत. आणि तिची रवानगी आता कुंटणखाण्यातल्या अंधाराच्या खोलीत झाली होती. पुढे हे असंच चाललं ज्याने-त्याने याव अंगाचे लचके तोडावेत आणि निघून जावं. पण एक दिवशी तिने तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वी सुद्धा झाली. पण बाहेर पडल्यावर जाव तरी कुठं ? हे तिला सुचेना म्हणून ती जवळच्या पोलिस स्टेशनला गेली आणि तिथल्या साहेबाला सगळ घडलेलं सांगितल. मग त्या साहेबाने तिला तिथेच बसवलं आणि मी तुझी मदत करील अस आश्वासन दिल आणि तो निघून गेला. थोड्या वेळाणे साहेब जेव्हा परत आला तेव्हा त्याचा सोबत ती कुंटणखाण्यावाली बाई आणि तिचे दोन गुंड होते. मग त्या साहेबाने सगळ्यांसमोर पूजाच्या कानामागे मारली आणि त्या बाईला म्हणाला " अक्का ले जावो इस रंडी को आप जैसे इज्जतदार लोगोंके खिलाफ कुछ भी बोल रही थी" मग तिला तिथून उचलून परत त्या अंधाऱ्या खोलीत आणून टाकण्यात आलं.

असेच दिवसामागून दिवस जात होते. पण एक दिवशी तिला समजल कि आपल्या भावंडांना आश्रमशाळेने काढून टाकलं होत. 'यांची बहिण शहरात मोठ्या मोठ्या साहेबांसोबत हिंडतीया' अशी गावात कुणी तरी बोंब उठवली होती. त्यामुळे ते सुद्धा गाव सोडून दूर कुठे तरी निघून गेले होते. या सगळ्या आघातमुळे ती एका कोपरयात रडत बसली होती. तेव्हा तिची तिथेच काम करणारी मैत्रीण तिला म्हणाली " जाने दे बहन ये जमाना है ही ऎसा, ना हमको जिने देता है, ना मरणे देता है सिर्फ पैसोके जोर पर नचाते है सब...और कम्बख्त पेट के लिये तो कुछ भी करणा पडता है."

आता पूजालाही समजलं होत कि समाजाची सगळी दार आपल्यासाठी बंद झाली आहेत. ही अंधारी खोली म्हणजेच आपल विश्व आहे म्हणून ती हि आता वाड्याबाहेर खुर्ची टाकून बसायला शिकली होती, कुणी गिऱ्हाईक जवळ आला कि हळुच पदर खाली पाडून त्याला आपल्याकडे बघायला लावायची कला ती सुद्धा शिकली होती आणि टीचभर पोटासाठी कुणी गिऱ्हाईक दिसला कि "ऐ साहब आ ना...ऐ साहब आ ना " असं म्हणायला अगदी साफइदारपने शिकली होती.

@सतीश भूमकर....
19.02.2014

Priyanka Bhope

Ashya ch vait lokan mule jag bighdat challay....

Shabda racha khup chan keli aahe...

mazi eshwar charni prarthna ashi vel kadhi ch kuna vr yeu naye....

nandan nangare

katha vastv ahe. khudko buland karna jruri hai dost fir dunya kya chij hai.

सतीश भूमकर


प्रतिक

 उपरोक्त गोष्ट ही, एका साऊथ सिनेमा मध्ये मांडली आहे.

Sachin01 More

Moregs