शापित राजकन्या

Started by santoshi.world, September 07, 2009, 07:42:17 PM

Previous topic - Next topic

santoshi.world

शापित राजकन्या

हस-या चेह-याआड लपवून
मनातील आपल्या वेदना,
वाट पाहत होती राजपुत्राची
एक शापित राजकन्या.

आयुष्यभर एकटेपणाचा
होता तिला शाप,
कळत नव्हते तिलाच
काय केले होते तिने पाप.

मनापासून केले प्रेम
हाच का झाला गुन्हा,
कधीच येणार नाही का
तो राजकुमार तिचा पुन्हा?

अर्ध्यावरच सोडून गेला
तो प्रेमाचा डाव,
मागे फक्त शिल्लक ठेवले
त्याने आठवणींचे गाव.

त्याच आठवणींच्या जगात
स्वत:ला ती सावरतेय,
बेधूंद होना-या मनाला
वेळोवेळी आवर घालतेय.

मोकळी करून देवून
डोळ्यांतील अश्रुंची लाट,
ठरवले तिच्याही मनाने
एकटीनेच चालायची हि वाट.

- संतोषी साळस्कर.


माझी हि कविता युगांधरा, अस्पर्शी, हि वाट एकटीची, काजळवात, मला अशीच राहु द्या, घरकुल या कादंबरीमधील नायिकांना समर्पित.  :)


rupa_80



chiv chiv

हस-या चेह-याआड लपवून
मनातील आपल्या वेदना,
वाट पाहत होती राजपुत्राची
एक शापित राजकन्या

Prem Mandale