जाणता अजाणता....

Started by nikhil misal, March 16, 2014, 03:42:55 PM

Previous topic - Next topic

nikhil misal

जाणता अजाणता कुठूनी येई असे प्रेम हे
जाणता अजाणता कवेत घेई असे प्रेम हे
जसे अलगद वाऱ्यासवे दरवळती गंध नवे
जसे अवखळ स्पंदनांचे गुणगुणते गीत नवे
गुंतता हृदय हे क्षणात होई मन बावरे
श्वास हे आभास हे बेधुंद सारे हे कसे
अबोल ही चाहूल
अंतरी का दाटली
मेघात ओली ही नशा
थोडेसे कोवळे, थोडे नवे नवे
वाटते प्रेम हे हवे हवे
आतुर जीव हा काहूर हे मनी
जुनीच रीत
ही का प्रीत ही
जसे अल्लड लाटेसवे मन तरते, हरवते
जसे अवखळ भावनांचे गुणगुणते गीत नव..

चित्रपट: लग्न पहावे करुन