प्रेम

Started by nikhil misal, March 16, 2014, 09:02:53 PM

Previous topic - Next topic

nikhil misal

सकाळी डोळे
उघडण्या पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते...
ते प्रेम आहे
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी
जवळ असल्याचा भास होतो...
ते प्रेम आहे भांडून सुधा
जिचा राग येत नाही..
ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर
पूर्ण दिवसाचा थकवा दूर
झाल्या सारखे वाटते...
ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर
मन मोकळे झाल्यासारखे वाटते...
ते प्रेम आहे
स्वताला किती ही त्रास
झाला तरी
ही जिच्यासाठी ख़ुशी मागता...
ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा
प्रयत्न करा विसरता येत नाही....
ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई
बाबाच्या सोबत जिचा फोटो
असावा असे आपल्याला वाटते..
ते प्रेम आहे
जिच्या चुकीना रागावतो
आणि नंतर एकांतात हसू येते...
ते प्रेम आहे...

-Nikhil Misal

Mayur Lakhadive

"कुटुंबाच्या फोटो मध्ये आई
बाबाच्या सोबत जिचा फोटो
असावा असे आपल्याला वाटते..
ते प्रेम आहे"

अतिशय सुरेख ओळी, अगदी काळजाला भिडल्या!  :)

nikhil misal

हो ना... धन्यवाद...!